शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण द्यावे – पालकमंत्री

शिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने  आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.शिक्षक गौरव दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पालकमंत्र्याच्या हस्ते आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  यावेळी शिक्षक गौरव दिन सोहळ्यानिमित्त प्राध्यापक आदित्य प्रवीण दवणे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षक गौरव दिनानिमित्त एकूण १२ शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कमल  गवई, दुंदु भोईर, सुषमा भानुशाली, प्रिया पोतनीस, सुनिता खैरनार, अनुजा कासरे, नेहा पिंपळे, फहमिदाबेगम शेख, अन्सारी शहाबुद्दिन, फरीदा चौधरी, विनिता  कुलकर्णी, निलिनी आहेर आदी शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मिनाक्षी  शिंदे यांचे हस्ते आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी महापालिका शाळा क्र. १८ चे शिपाई रमेश रासकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार या सोहळ्याला सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

%d bloggers like this: