शासकीय योजनांच्या शिबिराला ठाण्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपातर्फे `मोदी@९’ कार्यक्रमांतर्गत ठाणे शहरातील १५ ठिकाणी चार दिवसांसाठी आयोजित केलेल्या शिबिरांना पहिल्याच दिवशी ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांनी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घेण्याबरोबरच लाभ घेतला. येत्या २८ मे पर्यंत सुरू राहणाऱ्या या शिबिराचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.
ठाणे शहर भाजपाच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन विष्णूनगर येथील महापालिकेच्या शाळेमध्ये झाले. आमदार संजय केळकर यांनी दीप प्रज्वलित करून नागरिकांचे जीवनमान बदलण्याची ताकद असलेल्या शिबिराचे उद्घाटन केले.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री ई-श्रम योजना, बचत गट नोंदणी आणि सवलतीत कर्जपुरवठा आदी योजनांसह राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शिबिरात दिला जात आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कागदपत्रे घेऊन गर्दी केली होती. ठाण्यातील गरजू नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ठाणे शहरातील आणखी १४ ठिकाणी शिबिरांचे आज उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणीही नागरिकांनी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी केली होती.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading