वृक्षवल्ली २०१९ या प्रदर्शनात विहंग ग्रुपतर्फे प्लास्टीक विषयी जनजागृती

ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१९ या प्रदर्शनात विहंग ग्रुपतर्फे प्लास्टीक विषयी जनजागृती करण्यासाठी एक स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉल वरून पुन्हा वापरा अथवा नाकारा असा संदेश देण्यात आला. प्लास्टीक फ्री महाराष्ट्र ही चळवळ युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केली असून त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी विहंग सरनाईक यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. प्लास्टीकमुळे होणा-या प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी पुन्हा वापरा अथवा नाकारा असा संदेश देण्यात आला. या स्टॉलला ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी प्लास्टीक मुक्तीची शपथही देण्यात आली. बेस्ट आऊट ऑफ वेस्ट अशी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.

Leave a Comment

%d bloggers like this: