अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत यासाठी जनजागृती करण्याकरिता ठाणे वाहतूक पोलीस, रेमण्ड आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनतर्फे सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमध्ये घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये तब्बल ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत विविध प्रकारची चित्रं रेखाटली. तसंच घोषवाक्यही तयार केले. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. रेमण्डचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
