वागळेतील रस्ता रूंदीकरण मोहिमेत २०० बांधकामे जमीनदोस्त

रस्ता रूंदीकरण मोहिमेतंर्गत वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वरनगर या दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये जवळपास २०० पेक्षा जास्त बाधित व्यावसायिक बांधकामे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थीतीत जमीनदोस्त करण्यात आली. या रस्त्यात बाधित होणारी जवळपास १२५ निवासी बांधकामे पुनर्वसनानंतर निष्काषित करण्याचे आदेश आयुक्तांनी या कारवाईच्या वेळी दिले. महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार रस्ता रूंदीकरणाची मोहिम महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली असून वाघबीळ नाका ते वाघबीळ गाव या रस्त्यात बाधित होणारी जवळपास १२५ बांधकामे तोडून टाकण्यात आली होती. वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वर नगर या रस्त्याच्या रूंदीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत मराठा हाॅटेल सर्कल, कामगार हाॅस्पीटल आणि परिसरातील जवळपास २०० पेक्षा जास्त व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सावरकर नगर ते ज्ञानेश्वर नगर हा रस्ता २५ मीटरचा असून आता या कारवाईमुळे हा रस्ता ३० मीटरचा होणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: