वसंतविहार मध्ये ८ गाळ्यांचे कॉलमच खाली सरकल्याची घटना

वसंतविहार मध्ये ८ गाळ्यांचे कॉलमच खाली सरकल्याची घटना काल दुपारी घडली. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. गांधीनगर रस्ता रूंदीकरणात बाधित बांधकामावर कारवाई सुरू होती. तेथील गाळेधारकांचं पुनर्वसन महापालिकेनं पोखरण रोड नंबर २ वसंतविहार येथे केलं आहे. या गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावर स्लॅब बांधण्याचं काम महापालिकेच्या वतीनं सुरू होतं. त्यासाठी कॉलम खोदकाम सुरू असतानाच बाजूलाच असलेल्या बंद अवस्थेतील ८ गाळ्यांचे कॉलमच सरकले. ठाण्यात रस्ता रूंदीकरणात बाधित झालेल्या गाळेधारकांचे वसंतविहार येथील ग्लॅडी अल्वारीस रोडजवळ पुनर्वसन करण्यात आलं होतं. याठिकाणी गाळेधारकांनीच २२ गाळ्यांचे बांधकाम सुरू केले होते. हे काम अंतिम टप्प्यात येऊन तेथे दुकानदारांचे फलक लावण्यासाठी फ्रेम तयार करण्यात आली होती. या गाळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं त्याठिकाणी जाण्यासाठी खोदकाम करून कॉलम टाकण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी ८ गाळ्यांचे कॉलम सरकले. दरम्यान गाळ्यांचं जे काम करण्यात आलं होतं ते अतिशय कमकुवत असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली असावी असं पालिकेचं म्हणणं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: