वंचित मुलांच्या शिक्षणासाठी रोटरॅक्ट क्लब ठाणे इस्टच्या वतीनं ठाण्यात चॅरिटी कप ऑफ फूटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. टिकुजीनीवाडी येथील फूटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या फूटबॉल स्पर्धेत वाशी, नवी मुंबई, ठाणे ते अगदी केरळपासून १६ संघ सहभागी झाले होते. प्रथम विजेत्या केव्हीएम संघाला ९ हजार, उपविजेत्या पॉवरपुफ बॉईज संघाला ६ हजार आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे इस्टच्या वतीनं आत्तापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून हे फूटबॉल सामने आयोजित करण्यात आले होते. यातून जमा झालेला निधी वंचित मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाणार असल्याचं रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे इस्टच्या अध्यक्षा राधिका जगताप यांनी सांगितलं.
