राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्याचे सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्प

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्पांची निवड झाली असून यामध्ये सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे २ प्रकल्प असून इंडियन सायन्स काँग्रेससाठीही या शाळेच्या एका प्रकल्पाची निवड झाली आहे. डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेचा प्लास्टीकला पर्याय हा नाविन्य मेटकरी आणि जान्हवी महाडीक यांचा प्रकल्प, लोकपुरम पब्लिक स्कूलचा मॉईश्चर सेन्सिंग ॲण्ड इरिगेटिंग रोबोट हा अभिनव गणेशन् आणि तन्मय कुलकर्णी यांचा प्रकल्प, श्रीरंग विद्यालयाचा प्लास्टीक बॅन्ड आणि इटस् रेमेडीज् हा सोहम पाणंदीकर आणि श्लोक शिंदे यांचा प्रकल्प, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा बायोक्लिनर हा दीप देसाई आणि कार्तिक वॉरियर यांचा प्रकल्प, ए. के. जोशी स्कूलचा नापिक मातीचं नैसर्गिक संसाधनं वापरून सुपीक मातीत रूपांतर हा रमा रायकर आणि अवनी साठे यांचा प्रकल्प, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा आशिष टकले आणि ईशान खडसे यांचा प्रकल्प, एसपीव्हीटी सरस्वती विद्यालयाच्या युटीलायझेशन ऑफ फ्लोरल वेस्ट हा केतकी पवार आणि पूर्वा सावंत यांच्या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: