राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी केली पदकांची लयलूट

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धा सांगली येथे झाल्या. या स्पर्धेत ठाणे जिल्हा जिम्नॅस्टीक प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी मुंबई विभागातर्फे सहभागी होत १९ सुवर्ण, ९ रौप्य तर ५ कांस्य अशी एकूण ३३ पदकांची लयलूट केली आहे. १४ वर्ष वयोगटात आर्यन दौडे यानं ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि  १ कांस्य अशी ७ पदकं मिळवली. याच गटात मानस मानकवळेनं ३ सुवर्ण, २ रौप्य तर १ कांस्य अशी ६ पदकं मिळवली. प्रसाद पाटीलनं १ सुवर्ण तर मुलींच्या गटात सृष्टी भावसारनं १ सुवर्ण, १७ वर्ष मुलींच्या गटात सोहम नाईकनं ४ सुवर्ण, १ रौप्य अशी ५ पदकं, पूर्वी किरवे हिनं १ सुवर्ण, ३ रौप्य अशी ४ पदकं, गरिमा शर्मा आणि संजिवनी मते यांनी प्रत्येकी १ सुवर्ण पदकं पटकावली. तर मुलांच्या गटात श्रेयस मंडलिकनं १ सुवर्ण १ रौप्य अशी २ पदकं, १९ वर्षीय वयोगटात कार्तिक पडाळकर यानं २ सुवर्ण, २ कांस्य अशी ४ पदकं तर मुलींच्या गटात साक्षी पिंपळे हिनं १ सुवर्ण पदक पटकावलं. त्रिपुरा येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघामध्ये या स्पर्धकांची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू ठाणे जिल्हा जिम्नॅस्टीक प्रशिक्षण केंद्रात क्रीडा मार्गदर्शक महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: