रस्त्यावर लावण्यात आलेला फलक कोसळून बालवाडी शिक्षिका जखमी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती सुरेश उर्फ बाळामामा यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर लावण्यात आलेला फलक कोसळून नवी मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका जखमी झाल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घडली. ज्योती म्हात्रे असं जखमी शिक्षिकेचं नाव असून त्यांच्या बरोबर असलेल्या दुस-या महिला मात्र सुदैवानं बचावल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेत बालवाडी शिक्षक असलेल्या ज्योती म्हात्रे या ठाणे तहसिलदार कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्यासोबत शेजारी राहणा-या सुरेखा पष्टे त्यांच्याबरोबर होत्या. पष्टे यांच्या जातीच्या दाखल्यासंबंधी माहिती घेण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास पायी जात असताना अचानक फलक कोसळून म्हात्रे यांच्यावर कोसळला. यामध्ये म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: