ठाणे जिल्हा न्यायालयातील मुख्य सरकारी वकील संगिता फड यांच्या मुलाला वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काल तीन हात नाका येथे चुकीच्या दिशेनं जाणा-या आदित्य फडला वाहतूक शाखेच्या पोलीसांनी अडवलं. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस आणि त्यांच्यात वादावादी झाली. पोलीस बोलत असतानाही आदित्य फडनं दामटून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुस-या पोलीसानं अडवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य फडला अटक केली आहे.
