जिल्ह्यातील माहुली किल्ल्यावर शिवगर्भ संस्कार झाले. या किल्ल्याकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे या किल्ल्यावर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. दारू पार्टी आणि मौजमजा करणारी लोकं या ठिकाणी येऊन ऐतिहासिक वास्तूची विटंबना करत आहेत. या सर्वांला आळा बसावा आणि गडावर विकासाची कामं व्हावी यासाठी दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानातर्फे माहुली किल्ल्यावर दोन दिवस माहुली दुर्ग संवर्धन मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत किल्ल्यावर जाण्यासाठी सुरक्षित रस्ते, दिशादर्शक फलक, भगवा ध्वज लावण्याबरोबरच गडावर स्वच्छता करण्यात आली. शासनानं त्वरीत या किल्ल्यावर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानातर्फे करण्यात आली आहे.
