महापालिकेच्या रस्ता रूंदीकरणामुळे शिळफाट्यावरील वाहतूक कोंडी होणार कमी

ठाणे महापालिकेनं रस्ता रूंदीकरण मोहिम पुन्हा सुरू केली असून दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणाची धडक कारवाई कालपासून सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं ही कारवाई केली जात आहे. सध्या असणारा ३५ मीटरचा रस्ता ६० मीटर केला जाणार आहे. हा रस्ता रूंद झाल्यानंतर शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या रूंदीकरणामध्ये जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून १९० कुटुंबांचं पुनर्वसन महापालिकेनं केलं आहे. कालपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमध्ये कौसा, बाह्यवळण, टोलनाका ते भारत गियर कंपनी, दुवा अपार्टमेंट, शिबलीनगर, वाय जंक्शन या रस्त्यावरील ६ मोठ्या इमारती, ३० छोटी बांधकामं,  भारत गियर कंपनीचा काही भाग तसंच काही खाजगी जागांवर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या जलवाहिनीचं काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: