ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित ‘मध्यवर्ती क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा सेंट झेविअर्स हायस्कूल मानपाडा येथे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांच्या हस्ते संपन्न झाला.क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण झाल्यानंतर मानवंदना म्हणून स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असे संचलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम आणि डंबेल्स प्रकार सादर केले.ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या एकूण १२० शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची मध्यवर्ती स्पर्धा जाल्या.यांमध्ये एकूण आठ गटातील फुटबॉल,कबड्डी,खोखो,डॉजबॉल याबरोबरच वैयक्तिक स्पर्धाही पार पडल्या.विद्यार्थ्यांच्या स्पर्धेबरोबर शिक्षकांच्या प्रश्नमंजुषा, वक्तृत्व,रांगोळी, निबंध स्पर्धा क्रिकेट, खोखो वॉकिंग या स्पर्धाही यावेळी घेण्यात आला.या स्पर्धेला शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूना माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष सिद्धार्थ ओवळेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.यावेळी सेंट झेविअर्स हायस्कूल ट्रस्टी जयंत दिंडे,ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कबड्डीपटू आरती बेळवली,मुख्याध्यापिका आशा तेलवणे,लेखाधिकारी अजित धुरी, गटाधिकारी संगीता बामणे,आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण विभागाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
