मराठी नाटय़सृष्टीतील विनोदी कलाकार सागर सातपुते याच्यावर खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा

मराठी नाटय़सृष्टीतील विनोदी कलाकार सागर सातपुते याच्यावर खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. कळव्यातील एका महिलेला तू पाठविलेले मेसेज्, मी तुझ्या पतीला दाखवितो असे धमकावून तिच्याकडून रोख रक्कम आणि विमानाचे तिकीट स्वरूपात खंडणी उकळून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कळवा-खारेगाव येथे राहणाऱ्या पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मे महिन्यात गडकरी रंगायतन येथे नाटक पाहण्यास ही महिला गेली होती. यावेळी त्यांच्या मुलाने त्या नाटकातील कलाकारास भेटण्याचा हट्ट केला. परंतू त्यावेळी भेट झाली नाही. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तेच नाटक पाहण्यासाठी गडकरी रंगायतनमध्ये आले असता त्यांची कलाकारांशी भेट झाली. त्यावेळी सागर सातपुते या कलाकाराशीही ओळख झाली. ओळखीतून एकमेकांचे मोबाईल नंबर घेतल्याने  सागर नेहमी व्हॉट्सअॅपवर मेसेज करू लागला. मात्र त्याच्या मेसेजला उत्तर दिले नव्हते. दरम्यान कल्याणच्या अत्रे नाटयगृहात पुन्हा ते नाटक पाहण्यासाठी त्या आणि त्यांच्या मुलगा आणि एका मैत्रिणीसोबत गेल्या होत्या. नाटक पाहून झाल्यावर पुन्हा सागर सातपुतेसह इतर कलाकारांना भेटून फोटो काढले. त्यानंतर काही दिवसांनी पिडीत महिलेची मैत्रिण तिच्याकडे ठाण्यात चार दिवसांसाठी राहण्यासाठी आली असता तिने मोबाईलवर आलेले सागरचे मेसेज पाहून त्याला रिप्लाय पाठवला. 3 ते 4 दिवस मैत्रीण सागरच्या मेसेजला रिप्लाय देत होती. त्यामध्ये तिने सागरला तो फक्त कलाकार असल्याने आय लव यु वगैरे मेसेज पाठवला. तो मी घरात वादविवाद नको म्हणून डिलीट केला होता. तरीही मैत्रिण तिच्या घरी परतल्यावर सागर पिडीत महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवत होता. पण रिप्लाय न दिल्याने त्याने एक दिवस मोबाईलवर फोन करून उत्तर का देत नाही अशी विचारणा केली तसेच 35 हजारांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर तु पाठविलेले सर्व मेसेज पतीला दाखवण्याची धमकी दिली. अशाप्रकारे सागरने ठाण्यात 35 हजार, पुण्यात 25 हजार, मुंबईत 75 हजार आणि नवी मुंबईत 25 हजार रुपये घेतले. याच दरम्यान इंदोर येथे जाण्याकरिता त्याने 11 हजारांचे विमानाचे तिकीट आणि अलिबाग येथील रिसॉटमध्ये दोन रुम ऑनलाईन बुक करावयास लावले. एवढ्यावरच न थांबता सागरने अलिबागला भेटण्यासाठी बोलावून शरीरसुखाची देखील मागणी केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुरूवारी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: