नववर्षाचं स्वागत मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेषत: युवापिढीला आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी खाण्याच्या विविध प्रकारापासून मनोरंजनात्मक कार्यक्रमांपर्यंतचं आयोजन केलं होतं. रिमिक्सवर थिरकत्या पावलांवर एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी केवळ लहान मुलंच नव्हे तर तरूणांसह वृध्दांमध्येही चढाओढ लागली होती. अनेक ठिकाणी सरत्या वर्षाचे पुतळे उभारण्यात आले होते. बरोबर बारा वाजता हे पुतळे जाळून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांसाठी खरेदीची झुंबड उडाली होती. दारू तसंच मटण विक्रीच्या दुकानांमध्येही गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं.
