जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचं काम तसंच नवीन मतदार नोंदणीबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी अलिकडेच आढावा घेतला. १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून ३१ ऑक्टोबर पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. १८ विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्राम पंचायत कार्यालय येथे एका कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली असून मतदान केंद्राच्या ठिकाणीही कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण होणारे मतदार ३१ ऑक्टोबर पर्यंत आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांनी मतदारांची नोंदणी करण्यासाठी शिबीराचं आयोजन करावं असं आवाहनही जिल्हाधिका-यांनी केलं आहे.
