बोलण्यात गुंतवून विविध राज्यातील सराफांना गंडा घालणा-या दोघांना अटक

बोलण्यात गुंतवून विविध राज्यातील सराफांना गंडा घालणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं जेरबंद केलं आहे. सराफांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि हिरे लुटणारी एक आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे घाटकोपर येथील पंखेशा बाबा दर्ग्याच्या मागे सापळा रचून गुलाब शेख आणि घनश्याम रजपूत अशा दोघांना पकडण्यात आलं. त्यांच्या चौकशीत २ हजार ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० कॅरेटचे हिरे जप्त करण्यात आले. त्यांनी दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये गुन्हे करून २ हजार ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि हिरे चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: