प्रत्येक विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी येत्या एका आठवड्यात श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ही श्वेतपत्रिका पुढील सोमवार पर्यंत सादर करण्याचे आदेश सर्व अधिकारी आणि विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. गेल्या ४ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. त्यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत तर अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तर काही प्रकल्प मंजूर होऊन अंमलबजावणीच्या स्तरावर आहेत. या सर्वांची विभागनिहाय माहिती संकलित करावी तसंच प्रत्येक विभागानं केलेल्या कार्याची वस्तुस्थिती माहित व्हावी तसंच विभागाची कार्यक्षमता तपासण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रत्येक विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले आहेत. या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून विविध विभागांना देण्यात आलेली उद्दिष्टं आणि करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा घेण्यात येणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: