पुढच्या वर्षी दिवाळी ११ दिवस अगोदर येणार आहे. ही माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. पुढच्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये २७ ऑक्टोबरला रविवारी दिवाळी येणार आहे. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलं आहे. सोमण यांनी यावेळी पुढील ५ वर्षांच्या दिवाळीच्या तारखा दिल्या आहेत. २०२० मध्ये १६ नोव्हेंबरला, २०२१ मध्ये ५ नोव्हेंबरला, २०२२ मध्ये २६ ऑक्टोबरला, २०२३ मध्ये १४ नोव्हेंबरला, २०२४ मध्ये २ नोव्हेंबरला तर २०२५ मध्ये २२ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा येणार असल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
