जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना ३१६ स्टॉल्सचं वाटप करण्यात आलं.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे स्टॉल वाटप करण्यात आलं. महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्टॉल देण्याची मागणी गेली अनेक वर्ष विविध सामाजिक संस्था करत होत्या. दिव्यांग व्यक्तींच्या स्टॉलचा प्रश्न महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तात्काळ सोडवल्याबद्दल पालकमंत्र्यांनी आयुक्तांचे यावेळी विशेष आभार मानले.
