संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंडीत राम मराठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणा-या राज्यस्तरीय पंडीत राम मराठे स्मृती पुरस्कारानं प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडीत उल्हास कशाळकर यांना तर भरतनाट्यम् नृत्यांगना सूज्ञा नाईक यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पंडीत राम मराठे स्मृती समारंभाचा काल समारोप झाला. या समारोप कार्यक्रमात पंडीत उल्हास कशाळकर यांना राम मराठे स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. २५ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर युवा पुरस्कारानं भरतनाट्यम् नृत्यांगना सूज्ञा नाईक यांना सन्मानित करण्यात आलं. ११ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या संगीत समारोहाचा समारोप प्रसिध्द बासरी वादक रूपक कुलकर्णी, प्रसिध्द व्हायोलीन वादक पंडीत कैलाश पात्रा आणि सारंगी वादक उस्ताद फारूक लतीफ खान या तिघांच्या त्रिनाद वादनाच्या जुगलबंदीनं झालं.
