नोकरी लावण्याचं आमिष दाखवून १० लाखांचा गंडा घालणा-या भामट्याला अटक

सरकारी खात्यात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून ५ जणांना १० लाखांचा गंडा घालणा-या नीरज सोनावणे या भामट्याला ठाणे पोलीसांनी अटक केली आहे. सरकारी खात्यात नोकरी लावून देतो अशी बतावणी करणारा एक जण ठाण्यातील तलावपाळी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून नीरजला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे बनावट सदस्यत्व, भारत सरकार लिहिलेली चारचाकी गाडी, त्यावरील अशोक स्तंभ पोलीसांनी जप्त केले आहेत. त्याने पोलीसांना आपण असा कोणताही अधिकृत सदस्य नसून बनावट सदस्य असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या वाहनामध्ये बनावट सह्या असलेले नोकरीला लावण्याचे कॉल लेटर आढळून आले. यामध्ये रेल्वे तसंच जिल्हा प्रशासनासारख्या सरकारी नोकरीत उच्च पदांच्या कॉल लेटरचा समावेश होता. नीरज सोनावणे यानं एकूण ५ जणांची फसवणूक करून त्यांना साडेनऊ लाखाला गंडा घातल्याचं उघड झालं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: