धावत्या रिक्षात ३० वर्षीय महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना

महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असून पुन्हा एकदा धावत्या रिक्षात ३० वर्षीय महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. टेंभीनाका परिसरात राहणारी पिडीत महिला घोडबंदरवरील ओवळा नाका येथे एका खाजगी स्टुडीओमध्ये हेअर ड्रेसर आहे. तर हेमंत सोनावणे हा तिच्याबरोबरच काम करतो. ही पिडीत महिला नोकरीला लागल्यापासूनच सोनावणे याची तिच्यावर वाईट नजर होती. १५ नोव्हेंबर रोजी कामावरून सुटल्यावर पायी जात असताना छेड काढून रिक्षात विनयभंग केला होता. त्यावेळी या कृत्याबद्दल माफी मागून पुन्हा असं घडणार नाही असं सांगितलं होतं. तरीही त्याचा पाठलाग सुरूच होता. ६ डिसेंबर रोजी सकाळी कामावरून सुटल्यानंतर पुन्हा या प्रेमवीरानं पाठीमागे येत माफी मागितली. त्यानंतर घरी जाण्यासाठी म्हणून ही महिला रिक्षात बसल्यानंतर तोही जबरदस्तीने त्याच रिक्षात बसला आणि मागच्या वेळेप्रमाणेच रिक्षा उड्डाणपूलावर येताच त्याने अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. तेव्हा या महिलेनं त्याला प्रतिकार केला. रिक्षातच जोरजोरात ओरडाआरडा करून तिने रिक्षा थांबवायला लावली. त्यावेळी सोनावणेनं तिला धक्का मारल्यामुळे ही पिडीता खाली पडून जखमी झाली. सध्या तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी हेमंत सोनावणेला याप्रकरणी अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading