दिवाळी निमित्त विविध ठिकाणी महापालिकेकडून रोषणाई

दिवाळीनिमीत्त गेल्या वर्षीपासून ठाणे शहरातही दिव्याची आरास केली जाते. यंदाही शहरातील प्रवेशव्दारे, महत्वाचे चौक, वास्तु दिव्यांनी उजळून निघाले आहेत. दिवाळीनिमीत्त करण्यात आलेल्या रोषणाईने संपूर्ण ठाणे झळाळून निघालं आहे. ठाणे महापालिकेतर्फे ही रोषणाई करण्यात आली आहे. यंदा महापालिकेच्या हद्दीतील पाचही पूलांचं सुशोभिकरण करण्यात आलं असून या पूलांच्या खाली आणि वर दोन्हीकडे विविधरंगी रोषणाई करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग समिती कार्यालये, गडकरी रंगायतन, शहरातील मुख्य प्रवेशव्दार तसेच अन्य महत्वाच्या वास्तुंवर महापालिकेने विदयुत रोषणाई केली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर चेकनाक्यापासून ते घोडबंदर पर्यतच्या मार्गावर नयनरम्य विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच महामार्गालगत असलेल्या झाडांवरही विदयुत माळा सोडण्यात आल्या असून त्यामुळे झाडांना विविध रंगाची झळाळी प्राप्त झाली आहे. ठाणे शहरातील आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या मासुंदा आणी उपवन तलाव परिसरातही विदयुत रोषणाई करण्यात आली असून तलाव रंगीबेरंगी दिसत आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: