दरोडा, घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश

दरोडा, घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्याची कामगिरी ठाणे ग्रामीण पोलीसांनी केली आहे. एका पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी ही माहिती दिली. महम्मद शेख, राजकुमार गुप्ता, दिपू शेख, मुक्तार कुरेशी आणि छोटू अशा ५ जणांना ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. हे पाच जण इंद्रलोक येथील बाजारपेठ बंद होण्याच्या वेळी एका सोन्या-चांदीच्या दुकानावर दरोडा घालण्यासाठी येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं. या पाच जणांच्या चौकशीत गॅस कटरने बंद दुकानाचे शटर आणि ग्रील कापून दुकानातील मोबाईल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून ५४ मोबाईल, ६ लॅपटॉप असा साडेसहा लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: