डिम्ड कन्व्हेअन्स करणा-या गृहसंकुलांच्या संख्येत तिप्पटीनं वाढ

ठाण्यामध्ये डिम्ड कन्व्हेअन्स करून घेणा-या सोसायटींच्या संख्येत जवळपास तिपटीनं वाढ झाली आहे. राज्य शासनानं डिम्ड कन्व्हेअन्स करून घेण्यासाठी एक खास योजना जाहीर केली होती. त्यानंतर या योजनेमध्ये आणखी काही बदल करण्यात आले. त्यामुळं डिम्ड कन्व्हेअन्स करून घेणा-या गृहसंकुलांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. २०१६ मध्ये १५४ गृहसंकुलांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज केले होते तर यावर्षी ही संख्या नोव्हेंबर पर्यंत साडेचारशे पर्यंत झाली आहे. शासनाने डिम्ड कन्व्हेअन्स करण्याच्या अटी शर्थींमध्ये काहीशी शिथीलता आणल्यामुळे डिम्ड कन्व्हेअन्सच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठाण्यातील अनेक गृहसंकुलं ही जवळपास ३० ते ४० वर्ष पूर्वीची आहेत. त्यातील काही गृहसंकुलं धोकादायक झाल्यामुळं त्यांचं पुननिर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता डिम्ड कन्व्हेअन्स होणं आवश्यक असल्यामुळं सध्या डिम्ड कन्व्हेअन्सच्या प्रमाणात वाढ झाल्याचं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

%d bloggers like this: