ठाण्यामध्ये दोन विविध अपघातात एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार आणि अडीच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यामध्ये दोन विविध अपघातात एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार आणि अडीच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. राबोडी परिसरात शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास आझादनगर नंबर २ येथे राहणारे खान महम्मद कासीम अली हे आपल्या चार वर्षीय मुलगा समीर आणि अडीच वर्षीय सलमान यांना घेऊन राबोडीतील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. तेव्हा पार्क केलेल्या गाडीवर मोठ्या मुलाला बसवून छोट्या सलमानला दुचाकीजवळ उभे करून ते भाजी खरेदी करत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या पीकअपची धडक सलमानला बसली आणि त्यात सलमान जबर जखमी झाला. त्याच्या अंगावरून पीकअप गाडीचं चाक गेल्यानं त्याची छाती, मान आणि पोटावर तसंच डोक्यालाही गंभीर इजा झाली. त्याला रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी पीकअपचा चालक सय्यद रशीदला अटक केली आहे. दुसरा प्रकार घोडबंदर रस्त्यावरील हायपर सिटी मॉल जवळ घडला. भरधाव ट्रेलरची धडक बसून यतीन दळवी या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अंगावरून ट्रेलर गेल्यानं मृतदेहाचा चेंदामेंदा झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading