ठाण्यामध्ये कारच्या काचा फोडून चोरी होण्याच्या प्रकारामुळे कारमालक हैराण

ठाण्यामध्ये कारच्या काचा फोडून चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्यानं कारमालक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारफोड्याचा सुळसुळाट वाढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महिला पोलीस नाईक असलेल्या रूपाली देसाई यांनी आपली गाडी पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर उभी केली होती. त्यांना कल्याणला जावं लागल्यामुळं दुस-या दिवशी त्या गाडी घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्या गाडीची काच फोडून आतली म्युझिक सिस्टिम चोरट्यांनी पळवून नेल्याचं त्यांना दिसून आलं. याच परिसरात महागिरीतील मैदानात एकाच दिवशी ५ कारच्या काचा फोडून चोरी झाली होती. दुस-या घटनेत चंदनवाडी येथे राहणारे हॉटेल व्यावसायिक चंद्रशेखर शेट्टी हे बँकेतून रक्कम काढून परतत असताना झेरॉक्स काढण्यासाठी उतरले. हीच संधी साधून अवघ्या काही मिनिटात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून गाडीतील साडे त्र्याण्णव हजारांची रोकड पळवून नेली.

Leave a Comment

%d bloggers like this: