राष्ट्रवादी काँग्रेस ना लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून ठाण्यातून आनंद परांजपे यांना तर कल्याणमधून बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यातून अपेक्षित असलेला उमेदवार न मिळाल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाची माळ आनंद परांजपे यांच्या गळ्यात पडली आहे. आनंद परांजपे यांची लढत शिवसेना उमेदवारांची होणार आहे. एकेकाळी शिवसेनेतर्फे आनंद परांजपे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत बाजी मारली होती. आता तेच आनंद परांजपे शिवसेनेच्या उमेदवाराला विरोधात उभे ठाकले आहेत, कल्याण मधून राष्ट्रवादीने बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे, त्यांची लढत बहुदा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांच्याशीच होईल. कल्याणमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य उमेदवार मिळाला नाही त्यामुळे बाबाजी पाटील यांच्या गळ्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाची माळ पडली आहे. गेल्या वेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली होती. आणि शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता या दोन्ही मतदार संघात काय निकाल लागतो याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
