ठाण्यातील २ उड्डाणपूलांची उर्वरित कामं त्वरीत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ठाण्यात सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या बांधकामाची पाहणी केली. ठाण्यामध्ये नौपाड्यात संत नामदेव चौक, चरईमध्ये अल्मेडा जंक्शन आणि मीनाताई ठाकरे चौक असे तीन पूल उभारले जात आहेत. या पूलांची कामं बरीच रखडली असून हे पूल यापूर्वीच खुले होण्याची आवश्यकता होती. यापैकी चरईतील अल्मेडा जंक्शन येथे असलेला पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर संत नामदेव चौकातील उड्डाणपूलाच्या डांबरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. या पूलाचं काम ८ दिवसात पूर्ण करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी सूचना दिल्या. तर मीनाताई ठाकरे चौकातील पूलाच्या खांबांचे डांबरीकरणाचे काम सुरू असून हे काम २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अहिवर यांनी दिले.

Leave a Comment

%d bloggers like this: