ठाण्यातील अल्पवयीन मुलाची ऑनलाईन व्यवहारात ८ लाखांची फसवणूक

ठाण्यातील एका अल्पवयीन मुलाची ८ लाखांची फसवणूक ऑनलाईन व्यवहारात झाल्याचं उघडकीस आलं आहे

या १६ वर्षीय मुलाची इन्स्टाग्रामवर बसु खत्री नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीनं २ महिन्यात रक्कम दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी घरी आणलेले दागिने पालकांना न सांगता या मुलानं विकले आणि हे पैसे कथित खत्रीकडे गुंतवले. सुरूवातीस त्याला गुंतवलेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम मिळाली. नंतर कथित खत्रीनं त्याला १ लाख रूपये गुंतवण्याचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर सतत त्याने आणखी पैसे गुंतवण्याचा घोषा लावला. या मुलानं जवळपास १६ वेळा खत्रीकडे गुंतवणूक केली. मात्र त्याला रक्कम काही दुप्पट मिळाली नाही. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: