ठाणे शहराला पुढील एक ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार 

ठाणे शहराला पुढील एक ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील अशुध्द उदंचन केंद्राला पडघा येथून होणारा विज पुरवठा काल सायंकाळी वादळीवारा आणि विजेच्‍या कडकडाटामुळे सुमारे दोन ते अडीच तास पूर्णपणे बंद होता.  त्‍यामुळे ठाणे शहराला कमी पाणी पुरवठा झाला असून पुढील एक ते दोन दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्‍याचा योग्‍य तो वापर करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 

Leave a Comment

%d bloggers like this: