ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं तातडीनं देखभाल आणि दुरूस्तीची कामं हाती घेण्यात आल्यामुळं ठाणे महापालिकेला होणारा पाणी पुरवठा हा आज बंद करण्यात आला आहे. त्यामुळं मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर स्टेम प्राधिकरणातर्फे पंपिंगच्या दुरूस्तीसाठी उद्या सकाळी ९ ते रात्री ९ असा १२-१२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या परिसराचा पाणी पुरवठा उद्या म्हणजे २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ असा १२ तास बंद राहणार आहे.
