ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा दर बुधवारी बंद राहणार आहे. उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा विभागानं १४ टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळं स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेनं स्वत:च्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करून या पाणी बंदचा त्रास कमी होण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या म्हणजे बुधवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ असा १२ बारा तास शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवार म्हणजे उद्या रात्री ९ ते गुरूवारी सकाळी ९ पर्यंत असा १२ तास समतानगर, गांधीनगर, ऋतूपार्क, साकेत, महागिरी, उथळसर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे.
