ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं

ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यत्वे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत औत्सुक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे लोकसभा मतदार संघासाठी योग्य उमेदवार सापडत नाही तर शिवसेनेच्या उमेदवाराबाबत भारतीय जनता पक्षाचा आक्षेप आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली असून अन्य कोणत्याही उमेदवारासाठी काम करू असा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून संजीव नाईक, गणेश नाईक यांच्या नावाबाबत चर्चा झाली मात्र आता ही चर्चा आनंद परांजपे यांच्या पर्यंत आली असून बहुदा आनंद परांजपे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आनंद परांजपे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं असून स्वच्छ चारित्र्य ही त्यांची जमेची बाजू आहे त्यातच ठाण्यासारख्या ठिकाणे त्यांच्यासारखा शिक्षित उमेदवार काहीसा तारून जाऊ शकतो. सध्याचे विद्यमान खासदार शिवसेनेचे राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे, मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधामुळे शिवसेना आपला उमेदवार बदलणार कि पुन्हा तोच ठेवणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. आता युवा सेनेने आदित्य ठाकरे जर निवडणूक लढवू लढवू इच्छित असतील तर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे खरोखरच आदित्य ठाकरे ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असले तर मात्र राजन विचारे यांचं नाव कापल जाऊ शकते. पण आदित्य ठाकरे खरोखरच लोकसभा निवडणूक लढवू इच्छितात का हा खरा प्रश्न आहे. एकूणच ठाणे लोकसभा मतदार संघातील राजकीय वारे पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे या मतदारसंघात नक्की कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: