ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड परिसरातील दुकानांमध्ये स्वच्छता स्पर्धेचं आयोजन

गांधी जयंतीचं औचित्य साधून ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ठाणे नॉर्थ तसंच ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड परिसरातील अंदाजे २५ दुकानं, खाद्यगृहं, उपहारगृह, पानशॉप यामध्ये एका स्वच्छता स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वच्छतेच्या नियमांमध्ये ही खाद्यगृहं बसतात की नाही यानुसार काम करणा-या खाद्यगृहांना ७ हजार रूपयांचं प्रथम, ५ हजार रूपयांचं द्वितीय तर ३ हजार रूपयांचं तृतीय पारितोषिक दिलं जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ठाण्यातील कुंजविहार उपहारगृहामध्ये करण्यात आला. ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे राजेश मढवी यांनी स्वच्छता अभियानाचे नियम यावेळी सांगितले. ठाणे शहर सर्व बाबतीत अव्वल असून स्वच्छतेचे नियम पाळताना ते फक्त कागदावर नको तर आचरणात आणले पाहिजे असा संकल्प करावा असं आवाहन राजेश मढवी यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: