ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे युथ आयकॉन स्पर्धेत सहयोग व्यवस्थापन महाविद्यालयाचा रोहीत महाजन तर ज्ञानोदय महाविद्यालयाच्या कोमल सिंग यांची ठाणे युथ आयकॉन म्हणून निवड झाली. ठाणे महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेंद्र बनसोड यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि शहरातील युवकांमध्ये सुसंवाद साधण्याच्या निमित्तानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १९ ते २८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ठाणे युथ आयकॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक महाविद्यालयातून ३ मुलं आणि ३ मुलींचं नामांकन करण्यात आलं होतं. या नामांकन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या महाविद्यालयात मतदान घेऊन १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली होती. एकूण २० विद्यार्थ्यांतून रोहीत महाजन आणि कोमल सिंग यांची ठाणे युथ आयकॉन म्हणून निवड करण्यात आली. ठाणे युथ आयकॉन म्हणून निवडलेले हे विद्यार्थी महाविद्यालयीन स्तरावर स्मार्ट ठाणे युथ आयकॉन म्हणून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेवर आधारीत एक पथनाट्यही सादर करण्यात आलं.
