ठाणे मेट्रोचा विस्तार मुंब्रा-कौसा ते देसाई गावापर्यंत करण्याची आमदार सुभाष भोईर यांची मागणी

ठाणे मेट्रोचा विस्तार मुंब्रा-कौसा ते देसाई गावापर्यंत करावा अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंब्र्यापुढील भाग शीळ, कल्याण फाटा तसंच देसाई पर्यंत असल्याने मेट्रोचा विस्तार देसाई पर्यंत होणं गरजेचं आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहसंकुलं असल्यानं या ठिकाणी वाहतूक सुधारणा होणं गरजेचं आहे. येथील नागरिकांना ठाण्यात येण्या-जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं मुंब्रा शहरात सुरू करण्यात येणारी मेट्रो मुंब्रा, कौसा ते देसाई गावापर्यंत जोडण्यात यावी अशी मागणी सुभाष भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: