ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धेचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या वतीनं आनंद दिघे जयंतीचं औचित्य साधून ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. २७ जानेवारी रोजी शक्तीस्थळ येथे ही स्पर्धा होणार आहे. भीमसेन जोशी यांचे शिष्य नारायणराव देशपांडे आणि पंडीत नारायण बोडस, शोभा गुर्टू यांचे शिष्य यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रथम क्रमांकासाठी २०, द्वितीय क्रमांकासाठी १५, तृतीय क्रमांकासाठी १० आणि ५ हजार रूपयांची उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात येणार आहेत. तसंच उत्कृष्ट पखवाज वादन, गायन, तबला वादन, झांज आणि हार्मोनियम वादकांना प्रत्येकी ५ हजारांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील भजन मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून २५ मंडळांना यात सहभागी करून घेतलं जाणार आहे.अधिक माहितीसाठी ९८२१९ १४६०४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading