ठाणे महापालिकेला जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरणासाठी वॉटर डायजेस्ट वॉटर पुरस्कार

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नानं जोगिला मार्केट येथील सिमेंट कॉन्क्रीटमध्ये निद्रिस्त झालेल्या जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण उपक्रमाला जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा कायाकल्प सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि युनेस्कोच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणा-या वॉटर डायजेस्ट वॉटर ॲवॉर्डस् २०१८-१९ या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. पाणी स्रोतांचे पुनर्नवीनीकरण या विभागात जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण उपक्रमांतर्गत केलेल्या विशेष कार्याबद्दल पालिकेस हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. एका विशेष समितीमार्फत देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी स्रोतांचे पुनर्नवीनीकरणाबाबत केलेल्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण प्रकल्पाची विशेष नोंद घेत महापालिकेस हा पुरस्कारक देण्यात आला आहे. जोगिला तलावात अस्तित्वात असलेल्या सर्व नैसर्गिक स्रोतांचा शोध घेऊन ते संरक्षित करण्यात आले आहेत. अशा पध्दतीने पुनर्जिवित करण्यात येणारे हे देशातले पहिले उदाहरण असून जोगिला तलावाचे खोदकाम करून २ ते ३ पीटस् तयार करून भूगर्भात पाण्याची पातळी अस्तित्वातील झरे पुनर्जिवित करण्यात आले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: