ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेत आत्तापर्यंत १४०० मालमत्ता जप्त तर १२०० मालमत्ता सील

ठाणे महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठीची मोहिम अधिक तीव्र केली असून आत्तापर्यंत १४०० मालमत्ता जप्त तर १२०० मालमत्ता सील केल्या आहेत. ठाणे महापालिकेनं उत्पन्नाचा एक स्रोत असणा-या मालमत्ता कराच्या वसुलीकडे गेल्या तीन महिन्यापासून जोर दिला असून ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सध्या प्रभागनिहाय मालमत्ता वसुलीची कारवाई जोरात सुरू आहे. आत्तापर्यंत १० कोटींच्या १४०० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत तर १० कोटींच्या १२०० मालमत्तांना सील ठोकण्यात आलं आहे. जप्त आणि सील ठोकलेल्या मालमत्तांमध्ये दिवा आणि मुंब्र्यातील मालमत्तांचं प्रमाण अधिक आहे. मालमत्ता कराबरोबरच पालिकेनं पाणी देयकाची वसुली करण्यासाठीही जोरदार प्रयत्न चालवले असून आत्तापर्यंत ३०० नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी मार्च अखेरपर्यंत मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीचं ५०० कोटींचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आत्तापर्यंत यापैकी ४१० कोटींची वसुली झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading