ठाणे महापालिकेच्या कारवाईत बाधित झालेल्या १३ व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या मुळे न्याय मिळू शकला. शास्त्रीनगर हत्तीपूल येथे महापालिकेनं रस्ता रूंदीकरण केलं होतं. या रस्ता रूंदीकरणामुळे १३ व्यावसायिकांना बाधित व्हावं लागलं होतं. त्या व्यावसायिकांनी आपली समस्या शिवसेना उपविभाग प्रमुख अशोक कुलकर्णी यांच्याकडे मांडली. त्यांनी याप्रकरणी सातत्यानं पाठपुरावा केला आणि १३ व्यावसायिकांना तुळशीधाम येथील धर्मवीरनगर मध्ये गाळे मिळवून दिले आणि त्यांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला. पालकमंत्र्यांच्या हस्ते या गाळ्यांच्या चाव्या नुकत्याच या व्यावसायिकांना देण्यात आल्या.
