ठाणे महापालिकेची कर वसुली कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ठाणेकरांना ३१ मार्च पूर्वी मालमत्ता कर भरणं सुलभ व्हावं यासाठी महापालिकेची कर वसुली कार्यालयं सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत दुसरा आणि चौथा शनिवार तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर वसुली कार्यालयं सुरू राहणार आहेत. तर रविवारी सकाळी ही कार्यालयं अर्धा दिवस सुरू राहतील. २१ मार्चला मात्र या कार्यालयांना सुट्टी असेल. ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावरही मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा महापालिकेनं उपलब्ध करून दिली आहे.
