ठाणे महापालिका आणि पूर्वांग एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानं देशभक्तीपर गीतांच्या सांगितीक मैफलीचं आयोजन

ठाणे महापालिका आणि पूर्वांग एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज देशभक्तीपर गीतांच्या सांगितीक मैफलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पूर्वांगचे संस्थापक रोहन पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होत असून युवा संगीतकार रविराज कोलथरकर यांनी संगीत संयोजन केलेली तसेच संदेश कदम यांचे ताल संयोजन असलेली देशभक्तीपर गीतं या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये संगीत सम्राट पर्व १ आणि २ चे विजेते, बँड दंगल गर्ल्स आणि कोकणकन्या त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारे आणि राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक विजेत्या ५० हून अधिक गायक आणि वादक कलाकारांचा समावेश असणार आहे. सारे जहाँ से अच्छा, ने मजसी, शूर आम्ही सरदार यासारखी अनेक गाणी नवीन चालीत तर भारत हमको जानसे प्यारा है, मेरा रंग दे बसंती चोला यासारखी गाणी मूळ चाल न बदलता वेगळ्या वाद्यांच्या सहाय्यानं सादर केली जाणार आहेत. या देशभक्तीपर सांगितीक मैफलीचा आस्वाद ठाणेकरांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: