लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाणे परिमंडळ १ चे उपायुक्त डी. एस. स्वामी यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष शाखेचे एस. एस. बुरसे यांची बदली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय जाधव यांची कल्याण परिमंडळ ३ ला तर कल्याण परिमंडळ ३ चे संजय शिंदे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
