ठाणे पूर्वतील सावरकरनगर येथील एका उद्यानात उभारल्या जात असलेल्या मोबाईल टॉवरचे काम स्थानिक मंडळींनी बंद पाडले. ठाणे पूर्वतील गणपती विसर्जन घाट येथील रस्त्याच्या मधोमध असलेल्या उद्यानात मोबाईलचा टॉवर उभारण्यासाठी ठेकेदारानं ३० फूट बोअरिंग केलं होतं. हे काम करण्यासाठी उद्यानाचीही मोडतोड करण्यात आली. स्थानिक मंडळींना ही बाब कळताच स्थानिकांनी या कामाला हरकत घेत हे काम बंद पाडलं. स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी अशा कोणालाच या कामाची कल्पना नव्हती. एअरटेल कंपनीसाठी हा मोबाईल टॉवर उभारला जात असल्याचं सांगण्यात आलं. महापालिकेच्या शहर विकास विभागानं दिलेल्या परवानगीनुसार हा मोबाईल टॉवर उभारला जात होता. मात्र भर वस्तीत मोबाईल टॉवर नको म्हणून स्थानिकांनी या टॉवरला विरोध दर्शवला आहे. मोबाईल टॉवरमुळे होणारे दुष्परिणाम हे घातक असल्यामुळं हा टॉवर नको असल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/WhatsApp-Image-2018-10-04-at-7.19.05-PM.jpeg)