ठाणे पूर्वतील यश शिंदे याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिका-यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेत ठाणे पूर्वतील यश शिंदे याने चमकदार कामगिरी केली असून त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्ञानसाधना महाविद्यालयात बारावीत शिकणा-या यशनं १९ वर्षाखालील गटात जिम्नॅस्टीक स्पर्धेत सांघिक सुवर्ण तर करिअर एक्सरसाईझ स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. ऑलराऊंड स्पर्धेत त्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. १५ डिसेंबरला त्रिपुरा येथे होणा-या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: