ठाणे न्यायालयातून एका महिला वकीलाचा सोन्याचा ऐवज चोरून नेण्याची घटना

ठाणे न्यायालयातून एका महिला वकीलाचा सोन्याचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडली आहे. तुळशीधाम परिसरात राहणा-या ३२ वर्षीय महिला वकीलानं ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्या नेहमी आपल्या उजव्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या तर डाव्या हातात घड्याळ घालतात. शनिवारी ते आपलं घड्याळ घरीच विसरल्यानं त्यांनी आपल्या उजव्या हातातील एक सोन्याची बांगडी काढून डाव्या हातात घातली. न्यायालयामध्ये त्या तारीख घेत असताना मोबाईलवर तारीख पडताळून पाहत असताना त्यांना आपल्या डाव्या हातातील सोन्याची बांगडी गायब झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा त्यांनी पर्स तसंच इतर ठिकाणी बांगडीची शोधाशोध केली. मात्र कुठेही बांगडी मिळाली नाही. त्यावेळी आपली बांगडी चोरीला गेल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: