ठाणे ग्रामीण पोलीसांनी हस्तगत केलं ३ कोटींचं इफेड्रीन

ठाणे ग्रामीण पोलीसांच्या हाती ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठं घबाड हाती लागलं असून तीन कोटींचं २५ किलो इफेड्रीन हस्तगत करण्यात आलं आहे. मुंबईहून रिक्षानं भाईंदरमध्ये हे इफेड्रीन विकण्यासाठी आलेल्या दुकलीला पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून २५ किलो ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३ कोटी रूपये किंमत आहे हे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन वर्षापासून हे अंमली पदार्थ घरात लपवून ठेवण्यात आले होते. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंटास हॉटेलजवळ काहीजण इफेड्रीन घेऊन येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नवघरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राम भालसिंग यांच्या पथकानं सापळा रचून रिक्षातून आलेल्या योगेश शहा आणि सादेव जामदार अशा दोघांना पकडण्यात आलं. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडील बॅगेमध्ये हे २५ किलो इफेड्रीन मिळालं. या दोघांना ठाणे ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. यातील योगेश हा कपडे व्यापारी असून सादेव हा रिक्षा चालक आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: